Saturday, April 23, 2011

फुलपाखरांचे रंग देवून निघून गेलीस
तेंव्हा जांभळं आभाळ रडलं होतं मातीला बिलगून..
अन चिंचेच्या झाडामागे लपणारा चंद्र विसावला होता माझ्या अंगणातल्या तुळशीच्या रोपट्याखाली...

फुलपाखरांचे रंग देवून निघून गेलीस,
तेंव्हा घरभर पसरलेल्या तुझ्या आठवणी पाखरं होवून उडाल्या मध्यरात्री शेतावर..

फुलपाखरांचे रंग देवून निघून गेलीस ते परत कधीच न येण्यासाठी!

खरच..आता परत कधी भेटू आपण?
हजारो सूर्य विझून जातील तेंव्हा कदाचित..
कोट्यावधी श्वासांची आवर्तनं होतील तेंव्हा कदाचित..
कदाचित तेंव्हा माझ्या झिजलेल्या हातांना येईल तोच तुझा पारिजातकाचा गंध.
मुक्त दान देणारी नदी बनून वाहशील जेंव्हा माझ्या पेशीमधून तेंव्हा दिसेल का ग तुझा चेहरा मला दर्पणात?

फुलपाखरांचे रंग देवून निघून गेलीस पण तुझ्याकडे राहिलेला एकटा हिरवा रंग असेल का ग तुझ्या डोळ्यात परत भेटशील तेंव्हा?...

कविता: शंतनू
चित्र: अक्षय

1 comment:

shainaz said...

That is one awesome poem (IN MARATHI) I have read in years...:)